Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी आहे.”
तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.
नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूंना पिलाताकडे नेले.
त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”
तेव्हा पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”
तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.”
हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?”
तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता.
येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती.
त्याने येशूंना अनेक प्रश्न विचारले, परंतु येशूंनी त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले.
त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले.
“तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून चौकशी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले.
हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.
म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.”
परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला
पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”
तरीही आणखी एकदा तिसर्या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.”
परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले,
तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.
ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले.
येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या.
तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.
येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले.