मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”

  2. येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले.

  3. मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.

  4. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

  5. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

  6. परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले.

  7. नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्‍या गावाकडे निघून गेले.

  8. ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”

  9. येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”

  10. आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

  11. येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.”

  12. आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.”

  13. पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”

  14. यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले.

  15. त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

  16. जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे.

  17. मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.

  18. “जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”

  19. नंतर ते बाहत्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, “प्रभूजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात.”

  20. त्यांनी उत्तर दिले, “मी सैतानाला स्वर्गातून वीज कोसळावी तसे कोसळताना पाहिले.

  21. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.

  22. त्यावेळी येशू पवित्र आत्म्याद्वारे आनंदित होऊन म्हणाले, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍यांपासून या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि लहान बालकांना प्रगट केल्या, म्हणून मी तुमचे आभार मानतो कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.

  23. “माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”

  24. नंतर ते आपल्या बारा शिष्यांकडे वळून खासगी रीतीने म्हणाले, “परंतु जे तुम्ही पाहता ते पाहणारे डोळे धन्य.

  25. कारण मी तुम्हाला सांगतो अनेक संदेष्ट्यांनी आणि राजे यांनी तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची उत्कंठा धरली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही.”