मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला.

  2. आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.”

  3. तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.

  4. त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले.

  5. येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात?

  6. मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.”

  7. मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.

  8. मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला,

  9. येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले.

  10. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्‍यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला.

  11. मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही.

  12. नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता.

  13. नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली:

  14. “आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ”

  15. हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?

  16. पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “धन्यवादित परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”

  17. “मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”

  18. तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला.

  19. त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्‍यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.

  20. तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.”

  21. हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”

  22. तेवढ्यात कोंबडा दुसर्‍या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.

  23. प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.

  24. पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.”

  25. प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्‍यांनी येशूंवर अनेक आरोप केले.