मुख्य मजकुरावर जा

Hezekiah

116 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ezekias

Hezekiah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला.

  2. इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला.

  3. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.

  4. तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.

  5. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली

  6. म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली.

  7. तेव्हा हिज्कीयाह राजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील तिजोरीत असलेली सर्व चांदी त्याला दिली.

  8. यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले.

  9. अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.

  10. तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  11. पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”?

  12. राजा असे म्हणतात: हिज्कीयाहस तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

  13. ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका.

  14. “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे राजा असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,

  15. जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.

  16. यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  17. जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला.

  18. ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही.

  19. जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले,

  20. आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:

  21. “यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका.

  22. हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले.

  23. आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.

  24. मग आमोजाचा पुत्र यशायाहने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: अश्शूरचा राजा सन्हेरीबविषयीची तुझी प्रार्थना मी ऐकली आहे.

  25. त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझ्या घराची आवराआवर कर, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.”