मुख्य मजकुरावर जा

Hezekiah

116 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ezekias

Hezekiah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.

  2. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण:

  3. हिज्कीयाहने विचारले होते, “मी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”

  4. त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते.

  5. हिज्कीयाहने राजदूतांचे आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते दाखविले—चांदी, सोने, मसाले, उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

  6. तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”

  7. संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”

  8. तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेहचे वचन ऐका:

  9. हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.”

  10. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.

  11. “यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’

  12. “परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”

  13. यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

  14. यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.

  15. उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,

  16. हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,