मुख्य मजकुरावर जा

Hezekiah

116 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ezekias

Hezekiah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.

  2. “परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.

  3. हिज्कीयाहने यशायाहास विचारले, “याहवेह मला बरे करतील व मी आजपासून तीन दिवसांनी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”

  4. हिज्कीयाह म्हणाला, “सावली पुढेच जात असते ही साधारण गोष्ट आहे, तेव्हा ती मागे जावी असे करा!”

  5. त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादाना ने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजाराबद्दल ऐकले होते.

  6. हिज्कीयाहने राजदूतांचे स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते सर्व दाखविले—चांदी, सोने, मसाले, आणि उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

  7. तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून आले आहेत.”

  8. संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”

  9. तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “याहवेहचे वचन ऐका:

  10. हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभरात शांती आणि सुरक्षितता नसणार काय?”

  11. हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय?

  12. हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

  13. त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.

  14. त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीयाह, त्याचा पुत्र मनश्शेह,

  15. ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.

  16. आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  17. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.

  18. मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.

  19. दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला.

  20. हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली.

  21. राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.

  22. तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.

  23. परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले.

  24. हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.

  25. एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.