- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Haman
Haman चा उल्लेख असलेली वचने
मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.”
नंतर मर्दखय राजद्वारी परत आला, परंतु हामान घाईघाईने, आपले मस्तक अत्यंत शोकाने झाकून घरी परतला.
मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!”
ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले.
मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले.
त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.
हे ऐकताच राजा तीव्र संतापाने एकदम उठला आणि त्याचे मद्य सोडून बाहेर राजवाड्याच्या बागेत गेला. इकडे हामान, राजाने आता आपले भवितव्य ठरविले आहे, हे ओळखून आपले प्राण वाचवावे म्हणून एस्तेर राणीजवळ विनवणी करण्यासाठी तिथेच थांबला.
एस्तेर राणी ज्या आसनावर रेलून बसली होती, त्या आसनावर हामान वाकलेला होता आणि नेमक्या त्याच क्षणी राजवाड्याच्या बागेत गेलेला राजा परतला. तेव्हा संतापाने राजा ओरडला, “अरे, ती माझ्यासह इथे घरात असताना देखील हा राणीवर बलात्कार करू पाहतो काय?” राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताक्षणी राजसेवकांनी हामानाचा चेहरा झाकून टाकला.
मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!”
त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला.
त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते.
तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.
आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती.
ती म्हणाली, “महाराज, आपल्या मर्जीस येत असेल व मजवर आपली कृपादृष्टी असेल, व ते योग्य वाटत असेल, आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, सर्व प्रांतांतील यहूद्यांचा नायनाट करण्याविषयीचा अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा हुकूम रद्द करणारे फर्मान काढून ते सर्वत्र पाठविण्यात यावे.
मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले.
The ten sons of Haman the son of Hammedatha, the enemy of the Jews, slew they; but on the spoil laid they not their hand.
तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.”
तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.”
तेव्हा राजाने हे सर्व करण्याची आज्ञा दिली. फर्मान शूशन शहरात प्रसिद्ध करण्यात आले व हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर लटकविण्यात आली.
कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता.