Skip to content

Zeresh बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला. त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले.

  2. त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला.

  3. मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!”

  4. परंतु मी राजद्वारासमोर बसणार्‍या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्‍या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही.

  5. तेव्हा त्याची पत्नी जेरेश हिने आणि त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सुचविले, “पन्नास हात उंचीचा एक खांब तयार करून घ्या आणि सकाळीच मर्दखयाला त्या खांबावर देण्याची परवानगी राजाजवळ मागून घ्या. हे साध्य करून घेतल्यावर, राजाबरोबर खुशाल आनंदाने मेजवानीला जा.” या सूचनेने हामान प्रसन्न झाला आणि त्याने खांब तयार करून घेतला.

  6. मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!”