मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  2. येशूंच्या आईवडिलांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ते गालीलातील नासरेथ गावी आपल्या घरी परत आले.

  3. तो बालक वाढत गेला आणि बलवान झाला; तो शहाणपणाने भरलेला होता आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा होती.

  4. त्यांनी म्हटले, “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?”

  5. आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.

  6. हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्‍याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.

  7. आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”

  8. पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. ‘आमचा पिता तर अब्राहाम आहे,’ असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे.

  9. आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

  10. तो एनोशाचा पुत्र, तो शेथाचा पुत्र, तो आदामाचा पुत्र, तो परमेश्वराचा पुत्र होता.

  11. सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”

  12. पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”

  13. येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”

  14. मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”

  15. येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”

  16. “परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.

  17. “नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”

  18. याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते.

  19. पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्‍या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”

  20. एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.

  21. यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”

  22. त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला.

  23. सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.”

  24. दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  25. त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.