मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.

  2. “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.

  3. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”

  4. “तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: “मी मेंढपाळावर प्रहार करेन आणि मेंढरांची पांगापांग होईल.

  5. “अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.”

  6. आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”

  7. मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.

  8. जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”

  9. सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले.

  10. प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले.

  11. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.

  12. एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्‍याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना,

  13. तेव्हा जखर्‍याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला.

  14. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  15. तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल.

  16. यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही शुभवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठविण्यात आले आहे,

  17. ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.”

  18. अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात,

  19. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे.

  20. ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.

  21. यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.

  22. कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.”

  23. मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो

  24. माझा आत्मा माझ्या तारणार्‍या परमेश्वरामध्ये आनंद करतो,

  25. कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.