मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.

  2. राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल, आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील. जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”

  3. मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.

  4. जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.

  5. सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.

  6. राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल.

  7. तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील.

  8. यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल.

  9. जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल.

  10. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  11. आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.

  12. आपल्या उजव्या हाताने आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, परकीय येऊन कधीही पिणार नाहीत.

  13. परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल आणि याहवेहची स्तुती करतील, आणि जे द्राक्ष गोळा करतील, तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.”

  14. याहवेहनी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: “सीयोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ”

  15. त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.

  16. एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  17. मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— होय, ज्या अनेक गोष्टी त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, त्यांनी इस्राएलसाठी केल्या.

  18. ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले.

  19. त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

  20. तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

  21. मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?

  22. मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

  23. जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.

  24. हे याहवेह, स्वर्गातून अवलोकन करा व पाहा, तुमच्या भव्य, पवित्र, गौरवी सिंहासनावरून खाली पाहा. तुमचा तो आवेश व तुमचे सामर्थ्य कुठे आहेत? तुमची आमच्यावरील कोमलता व करुणा आम्हाला देण्याचे तुम्ही आवरून धरले आहे.

  25. परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.