मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले? आणि आम्ही तुमचा सन्मान करणार नाही, अशी आमची अंतःकरणे कठीण का केली? जे वंशज तुमचे वारस आहेत, त्या तुमच्या सेवकांप्रीत्यर्थ परत या.

  2. थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे.

  3. तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत.

  4. अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!

  5. जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील!

  6. जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.

  7. प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, कोणत्याही कानावर ते पडले नाही, कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.

  8. जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता. परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो, तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला. आता आमचा उद्धार कसा होणार?

  9. तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.

  10. परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत.

  11. हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका; आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका. हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा, कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत.

  12. हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार? तुम्ही स्तब्ध राहून आम्हाला प्रमाणाबाहेर शिक्षा करणार काय?

  13. “ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले; ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे. ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’

  14. ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,

  15. हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;

  16. जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो.

  17. “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”

  18. Your iniquities, and the iniquities of your fathers together, saith the LORD, which have burned incense upon the mountains, and blasphemed me upon the hills: therefore will I measure their former work into their bosom.

  19. याहवेह असे म्हणतात: “कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका, त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’ त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन; मी त्या सर्वांचा नाश करणार नाही.

  20. मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील.

  21. माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.

  22. “पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,

  23. तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”

  24. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.

  25. त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्‍या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल.