मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.

  2. मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, आणि जलाशय वाळवून टाकेन.

  3. मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन, अपरिचित रस्त्यावरून मी त्यांचे मार्गदर्शन करेन; मी त्यांच्यापुढील अंधकार प्रकाशात बदलेन आणि खडबडीत जागा सपाट करेन. या गोष्टी मी करेन; मी त्यांना टाकणार नाही.

  4. आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक, आणि बहिरे कोण आहेत, मी पाठविलेले संदेशवाहक? आंधळे कोण आहेत, ज्यांनी माझ्याशी करार केला आहे, याहवेहच्या सेवकासारखे आंधळे?

  5. त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने याहवेह प्रसन्न होतात.

  6. याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले, आणि इस्राएलला लुबाडू दिले? ज्यांच्याविरुद्ध आम्ही पातक केले ते याहवेहच नाहीत काय? त्यांनी याहवेहचे मार्ग अनुसरले नाहीत; त्यांच्या नियमांचे पालन केले नाही,

  7. म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी आणि लढाईचा विध्वंस त्यांच्यावर ओतला. चारही बाजूने ते ज्वालांनी वेढले गेले होते, तरीसुद्धा त्यांना उमगले नाही; ज्वालांनी ते भस्म झाले, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही.

  8. परंतु आता, याहवेह असे म्हणतात— याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.

  9. जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.

  10. कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,

  11. कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस, आणि मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन, तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.

  12. भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,

  13. मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ माझ्या पुत्रांना दूरवरून आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—

  14. जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”

  15. परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि तुम्ही माझे निवडलेले सेवक आहात. जेणेकरून तुम्ही ओळखावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, मीच परमेश्वर आहे हे समजून घ्यावे. माझ्यापूर्वी दुसरा कोणी देव अस्तित्वात नव्हता, आणि माझ्या नंतरही नसेल.

  16. मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.

  17. मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले— मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.” याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे.

  18. सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे. माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.”

  19. तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह असे म्हणतात— “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन आणि सर्व बाबेलच्या लोकांना ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन.

  20. मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे, इस्राएलचा निर्माणकर्ता व तुमचा राजा आहे.”

  21. याहवेह असे म्हणतात— ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, महासागरामधून रस्ता तयार केला,

  22. पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे ओसाड भूमीत झरे बनवित आहे.

  23. रानातील हिंस्र श्वापदे कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, ओसाड भूमीत झरे बनवितो,

  24. ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.

  25. “परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही, इस्राएला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला थकविले नाही.