मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे, तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे. मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’; मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही.

  2. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.

  3. कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन.

  4. हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,

  5. “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.

  6. तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.

  7. “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.

  8. ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.

  9. मी वाळवंटात देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. गंधसरूची झाडे माळरानात लावेन, चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन.

  10. जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील, ते विचार करतील व त्यांना समजेल, याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे.

  11. “तुमचा वाद पुढे आणा,” असे याहवेह म्हणतात. “तुमचा विवाद पुढे चालवा” असे याकोबाचा राजा म्हणतो.

  12. “मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे.

  13. मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला.

  14. मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते— तुमच्या दैवतांपैकी कोणीही सल्ला दिला नाही, मी विचारले तेव्हा त्यांच्यातील कोणीही उत्तर दिले नाही.

  15. “पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय आणेल.

  16. तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही.

  17. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;

  18. पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”

  19. परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात:

  20. “मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,

  21. “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.

  22. पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”

  23. याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.

  24. त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा.

  25. याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.