मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात, जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात.

  2. कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने, आम्ही आमचे शत्रू पायाखाली तुडवू शकलो.

  3. आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता; आमचा द्वेष करणार्‍यांना तुम्ही लज्जित करता.

  4. आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला

  5. परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली; आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही.

  6. तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले; तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही.

  7. आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.

  8. आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.

  9. पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.

  10. जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,

  11. तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.

  12. तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो; वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.

  13. हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात? जागृत व्हा! आमचा कायमचा त्याग करू नका.

  14. तुम्ही आपले मुख का लपविता? आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?

  15. आम्हाला साहाय्य करण्यास उठा; तुमच्या अढळ प्रीतीने आम्हाला सोडवा.

  16. तू पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे आणि तुझे ओठ कृपेने अभिषिक्त आहे, कारण परमेश्वराने तुला अनंतकाळासाठी आशीर्वादित केले आहे.

  17. हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.

  18. तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे.

  19. तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात.

  20. राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत.

  21. तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल; त्याचा आदर कर, कारण तो तुझा स्वामी आहे.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

  23. आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.

  24. परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.

  25. राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.