मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील; आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात:

  2. “त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”

  3. आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते, कारण ते न्यायी परमेश्वर आहेत. सेला

  4. “ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.

  5. तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच.

  6. मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.

  7. कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;

  8. पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.

  9. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.

  10. बैलाचे मांस माझा आहार आहे का किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?

  11. “परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,

  12. आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”

  13. परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?

  14. कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.

  15. तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.

  16. “तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा, मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही:

  17. जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”

  18. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.

  19. तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.

  20. पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते, म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.

  21. आनंदाची व हर्षाची वाणी मला ऐकू द्या; म्हणजे तुम्ही चिरडलेली माझी हाडे प्रफुल्लित होतील.

  22. माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा आणि माझे सर्व अपराध पुसून टाका.

  23. परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.

  24. मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.

  25. तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.