मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

  2. या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा; त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

  3. दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.

  4. ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”

  5. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

  6. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.

  7. कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.

  8. ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला

  9. प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्‍यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.

  10. परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.

  11. कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.

  12. परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात; परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत.

  13. जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत.

  14. एक गीत. कोरहाच्या पुत्रांची एक स्तोत्र रचना. याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.

  15. परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.

  16. आम्ही जे ऐकले होते, आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात, आमच्या परमेश्वराच्या नगरात: परमेश्वर सर्वकाळासाठी तिला स्थिर करतील. सेला

  17. परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.

  18. हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.

  19. तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत.

  20. कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.

  21. कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही; किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही.

  22. परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला

  23. आसाफाचे स्तोत्र. सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.

  24. सौंदर्यात परिपूर्ण असलेल्या सीयोनमधून, परमेश्वराचे गौरव प्रकाशते.

  25. आमचे परमेश्वर येतील आणि ते स्वस्थ राहणार नाहीत; त्यांच्याभोवती खवळलेले वादळ व विध्वंस करणारा अग्नी आहे.