मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’

  2. जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार? तुझी पापे जरी पुष्कळ आहेत, तरी त्याचे त्यांना काय?

  3. जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?

  4. तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे, जे रात्रीच्या वेळी गीत देतात, ते कुठे आहेत,

  5. खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.

  6. मग ते तुझे कसे ऐकतील, जेव्हा तू म्हणतो की तुला ते दिसत नाहीत, की तुझा वाद त्यांच्यासमोर आहे आणि तू त्यांची वाट पाहावी,

  7. आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही.

  8. “अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे.

  9. ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे.

  10. “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत.

  11. न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात.

  12. त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे.

  13. जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली, तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील आणि संतृप्तीची वर्षे बघतील.

  14. “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही.

  15. “दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी, तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात.

  16. सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये; आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये.

  17. तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय?

  18. “परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत. त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे?

  19. त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत, किंवा, ‘तुम्ही दुष्कृत्य केले आहे’ असे त्यांना कोण म्हणणार?

  20. ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.

  21. परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे! त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही.

  22. “ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात, आणि झर्‍यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात;

  23. ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे, आपल्या मंडपातून ते कसे गडगडाट करतात हे कोणाला समजते?

  24. पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात, आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात.

  25. अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार करतात आणि विपुलतेने अन्न पुरवितात.