मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले,

  2. जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली,

  3. जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो?

  4. कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?

  5. मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे, आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे.

  6. कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.

  7. याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,

  8. “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”

  9. तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:

  10. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  11. मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:

  12. “पुरुषासारखी आपली कंबर कस; मी तुला प्रश्न विचारतो, आणि तू मला त्याचे उत्तर देशील.

  13. “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय? स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय?

  14. तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?

  15. मग मी स्वतः हे मान्य करेन की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.

  16. “बेहेमोथ कडे पाहा, तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. तो बैलाप्रमाणे गवत खातो.

  17. परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे, तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो.

  18. त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही. तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील?

  19. मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे? आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे.

  20. “लिव्याथानाचे अवयव, त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही.

  21. मग इय्योबाने याहवेहला म्हटले,

  22. “तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे; तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.

  23. “तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’

  24. माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.

  25. याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत.