मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.”

  2. मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.

  3. इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले

  4. त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे व सोन्याची अंगठी दिली.

  5. याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती.

  6. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  7. कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

  8. याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,

  9. स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.

  10. ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,

  11. “सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”

  12. मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.

  13. माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.

  14. तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”

  15. भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.

  16. दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला. याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!

  17. पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला

  18. परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.

  19. मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

  20. मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.

  21. याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका.

  22. कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला

  23. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.

  24. अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह

  25. हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील.