मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा.

  2. दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.

  3. सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.

  4. परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात.

  5. दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत, तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील; आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन

  6. त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत.

  7. याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.

  8. संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.

  9. लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

  10. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  11. मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

  12. तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

  13. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

  14. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

  15. संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.

  16. मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन; हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  17. माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात.

  18. कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात.

  19. तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे; त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत.

  20. याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत; न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे.

  21. ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.

  22. याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.

  23. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  24. सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.

  25. जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात; दीनांच्या आक्रोशाकडे ते दुर्लक्ष करीत नाही.