मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.

  2. जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो, आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात. याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?

  4. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.

  5. कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.

  6. मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

  7. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.

  8. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.

  9. दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.

  10. पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.

  11. दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.

  12. अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

  13. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  14. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

  15. दावीदाचे मिक्ताम परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.

  16. मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”

  17. पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”

  18. याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.

  19. मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.

  20. मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

  21. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.

  22. तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

  23. दावीदाची एक प्रार्थना. याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.

  24. तुम्ही माझा रास्त न्याय करा; जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो.

  25. जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे, रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे, तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही; माझ्या मुखाने मी अपराध केले नाही.