मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.

  2. माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत, माझी पावले कधी घसरली नाहीत.

  3. मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.

  4. तुमचा आश्रय घेणार्‍यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.

  5. तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;

  6. हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा; तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.

  7. याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.

  8. मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.

  9. संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला, याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.

  10. याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.

  11. स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  12. मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.

  13. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आणि पर्वताचे पाये हादरले. याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.

  14. त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.

  15. आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.

  16. करुबावर आरूढ होऊन ते उडून आले; वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.

  17. अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन; आपल्या सभोवती त्यांचा मंडप केला आहे.

  18. त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले.

  19. याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.

  20. त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.

  21. हे याहवेह, तुमच्या धमकीने तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले, आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.

  22. वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.

  23. माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.

  24. त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.

  25. याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.