God
God चा उल्लेख असलेली वचने
कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.
त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.
मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.
याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.
विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,
शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.
याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे; माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे.
तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे, तुमचा उजवा हात मला आधार देतो; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.
त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.
लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,
याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!
परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,
ते माझी माझ्या वैर्यांपासून सुटका करतात. तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.
म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी आपल्या नावाची स्तुती गाईन.
ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.
तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे.
याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.