God
God चा उल्लेख असलेली वचने
तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.
त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.
ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”
तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे;
मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.
माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.
सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.
मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.
जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा.
कारण त्यांनी दुःखितांचे दुःख, तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही; त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.
महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्यांपुढे मी माझे नवस फेडीन.
नम्र लोक खातील आणि तृप्त होतील; जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील. तुमची हृदये सर्वदा सजीव असो!
सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील.
कारण याहवेहचेच राज्य आहे आणि सर्व राष्ट्रांवर तेच अधिपती आहेत.
पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील; जे लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत व धुळीस मिळणारे प्रत्येक त्यांच्यासमोर गुडघे टेकतील.
येणारी संपूर्ण पिढी त्यांची सेवा करेल; पुढच्या पिढीला ती प्रभूच्या अद्भुत कृत्यांबद्दल सांगेल.
ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील, आणि न जन्मलेल्या पिढीला त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात.
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.
तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे.
खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन.
दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.