मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.

  2. याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा.

  3. कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.

  4. मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,

  5. म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.

  6. याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते.

  7. माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.

  8. दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?

  9. मी याहवेहला एक याचना केली, हीच माझी आकांक्षा आहे: मी आयुष्यभर याहवेहच्या भवनात वस्ती करावी जेणेकरून मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या मंदिरात ध्यान करावे.

  10. कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.

  11. माझ्या सभोवती असणार्‍या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

  12. याहवेह, माझी याचना ऐका; माझ्यावर दया करा आणि मला उत्तर द्या.

  13. तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.

  14. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, तुमच्या दासाला रागाने दूर लोटू नका; तुम्हीच माझे सहायक राहिले आहात; हे माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, मला नाकारू नका वा माझा त्याग करू नका.

  15. माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.

  16. याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा; माझी छळणूक करणाऱ्यांमुळे मला सरळ मार्गावर घेऊन चला.

  17. मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.

  18. याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.

  19. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.

  20. मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका.

  21. कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.

  22. याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.

  23. याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.

  24. याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.

  25. तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.