God
God चा उल्लेख असलेली वचने
कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्या मार्गाने मानवांशी बोलत असतात— जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.
परमेश्वर त्यांच्या कानात बोलून आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,
म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील आणि अहंकारापासून दूर राहतील,
आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो, ‘त्यांना मरणाकडे जाण्यापासून वाचवा; त्यांच्यासाठी खंडणी मला मिळाली आहे—
मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.
“परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात; दोनदा किंवा तीनदाही ते करीत असतात—
“इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे, परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.
कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात काही लाभ नाही.’
“तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका. वाईट करणे हे परमेश्वरापासून आणि अयोग्य करावे असे सर्वसमर्थापासून दूरच असो.
ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात; आणि त्यांच्या वर्तनास अनुरूप असे फळ त्यांना देतात.
परमेश्वर चूक करतील, किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे.
त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले? किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला?
जर त्यांच्या मनास आले आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,
जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय? जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?
जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही, कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?
“मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.
लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही, जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.
कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात, रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.
कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.
त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.
परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,
“समजा कोणी परमेश्वराला म्हटले, ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.
मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’
जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय? मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे; म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा.
कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो; आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”