मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.”

  2. पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”

  3. अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत स्थगित झाले.

  4. आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्‍याह संदेष्टा यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली.

  5. मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.

  6. पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.

  7. आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे.

  8. त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत.

  9. कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.

  10. “बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला.

  11. नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.

  12. त्याने त्याला सूचना दिली, ‘ही पात्रे घ्यावी आणि यरुशलेमच्या मंदिरात ठेवावी. परमेश्वराचे मंदिर पूर्वी होते त्याच ठिकाणी पुन्हा बांधले जावे.’

  13. “म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.”

  14. आम्ही विनंती करतो की बाबेलचे राजकीय दप्तर तपासले जावे व कोरेश राजाने परमेश्वराच्या मंदिराची यरुशलेममध्ये पुनर्बांधणी करावी अशी आज्ञा दिली होती की नाही हे पाहावे व मग आपली या प्रकरणी काय इच्छा आहे हे आम्हाला कळवावे.

  15. कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता: तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी.

  16. आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.

  17. परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात अडथळे आणू नका. यहूदीयाचा राज्यपाल आणि इतर यहूदी पुढाऱ्यांनी पूर्वीच्याच जागेवर ते मंदिर बांधावे.

  18. एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.

  19. स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.

  20. मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील.

  21. ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.

  22. म्हणून यहूदी पुढार्‍यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्‍याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले.

  23. याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला.

  24. या समर्पणविधीमध्ये शंभर बैल, दोनशे मेंढे आणि चारशे नरकोकरे अर्पण केली गेली, आणि इस्राएलांच्या बारा वंशासाठी बारा बोकडे पापार्पण म्हणून बळी दिले गेले.

  25. मग त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे यरुशलेममध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपआपल्या विभागांसाठी याजक आणि लेवींचीही नियुक्ती केली.