मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता.

  2. दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता.

  3. परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले.

  4. शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले.

  5. त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

  6. शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले.

  7. आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.

  8. या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?”

  9. तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस,

  10. तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.”

  11. शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली.

  12. आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.

  13. “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत.

  14. परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.

  15. सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”

  16. हीराम पुढे हे देखील म्हणाला, “इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल.

  17. मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.

  18. परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात होती.

  19. आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले:

  20. भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.

  21. परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती;

  22. याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्‍यात ठेवल्या.

  23. तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.

  24. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  25. इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.