मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यदूथून व त्याचे पुत्र: गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.

  2. (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)

  3. हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.

  4. ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.

  5. अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा व पउलथय आठवा. (कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.)

  6. ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्याच प्रकारे सर्व विभाजित द्वारपालांना त्यांच्या पुढार्‍यांव्दारे याहवेहच्या मंदिराची सेवा देण्यात आली.

  7. अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.

  8. यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.

  9. लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत.

  10. हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

  11. येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)

  12. दावीदाने शिरगणती केली, तेव्हा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा त्या गणतीमध्ये समावेश केला नव्हता, कारण याहवेहने इस्राएली लोकांची संख्या आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करण्याचे वचन दिले होते.

  13. राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे.

  14. परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’

  15. “तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे.

  16. याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली.

  17. याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.

  18. त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’

  19. “म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल.

  20. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  21. म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.”

  22. पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला.

  23. याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला.

  24. आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.

  25. दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.”