मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.

  2. नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.

  3. दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,

  4. परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.

  5. परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.

  6. तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’

  7. “आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.

  8. तुझे याहवेह तुला सुबुद्धी आणि चातुर्य देवो आणि जेव्हा ते तुला इस्राएलवर अधिकार देतील, तुला त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची बुद्धी देवो, म्हणजे तू याहवेह तुझ्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करशील.

  9. याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको.

  10. “मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.

  11. सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

  12. तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.

  13. आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”

  14. दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी.

  15. चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”

  16. अम्रामचे पुत्र: अहरोन व मोशे. अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे.

  17. परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.

  18. लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले.

  19. कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत.

  20. लेव्यांचा कार्यभाग, अहरोनाच्या वंशजांना याहवेहच्या मंदिराच्या सेवेत याप्रमाणे मदत करावी: अंगणाची देखरेख, इतर खोल्यांची देखरेख, सर्व पवित्र वस्तूंचे शुद्धीकरण आणि परमेश्वराच्या भवनातील इतर कामे करणे.

  21. दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत.

  22. शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.

  23. याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत.

  24. कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

  25. त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.