God
God चा उल्लेख असलेली वचने
परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.
नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला.
जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.
परंतु दुसर्या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.
याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.
जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”
तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.
परंतु त्यांनी कोश हालविल्यानंतर, याहवेहचा हात त्या शहराच्या विरुद्ध उठला आणि ते फार घाबरून गेले. परमेश्वराने त्या शहरातील लहान मोठ्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.
म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”
तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता.
याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता,
तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.”
ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.”
पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्यांना त्याच पीडांनी पीडले आहे.
ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील.
फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का?
याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,
परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”
त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या.
ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.
लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.
पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.
आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.
आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”