मुख्य मजकुरावर जा

Canaan

89 वचने · 15 कुटुंब सदस्य

Canaan चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.”

  2. परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.”

  3. कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली.

  4. आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.”

  5. मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती?

  6. फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा,

  7. निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले.

  8. मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला.

  9. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.

  10. योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत.

  11. योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”

  12. ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”

  13. मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले.

  14. योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला.

  15. जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”

  16. याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला

  17. मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).

  18. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  19. “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.”

  20. त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली.

  21. ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.

  22. एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;

  23. इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला.

  24. “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,

  25. तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका.