Skip to content
दानीएल ६:६-२८

दानीएल ६:६-२८

६
तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत!
७
आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.
८
तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”
९
तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.
१०
जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.
११
नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले.
१२
मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”
१३
नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.”
१४
जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.
१५
नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.”
१६
तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”
१७
आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये.
१८
मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.
१९
राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला.
२०
जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”
२१
तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो!
२२
माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”
२३
तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.
२४
नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्‍यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले.
२५
नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले: “तुमची भरपूर उन्नती होवो!
२६
“माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा.
२७
ते सुटका करतात व ते वाचवितात;
२८
याप्रमाणे दारयावेश राजाच्या आणि कोरेश पारसीच्या कारकिर्दीत दानीएल समृद्ध झाला.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options