मुख्य मजकुरावर जा

Word of God बद्दल बायबलमधील वचने: Unbelief in

38 वचने · 13 पैलू

Unbelief in बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?

  2. कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.

  3. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  4. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  5. जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल.

  6. म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.

  7. “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे? त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे? त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना, नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना?

  8. कारण हे आहे: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे.”

  9. ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने परमेश्वर या लोकांशी बोलतील,

  10. ज्यांना ते असे म्हणाले, “हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;” आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;” परंतु ते ऐकणार नाहीत.

  11. म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.

  12. म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका:

  13. कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.

  14. दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.

  15. हा मार्ग सोडा, या वाटेवरून दुसरीकडे जा, आणि इस्राएलचे जे पवित्र परमेश्वर आहेत त्यांच्याबरोबर आमची समोरासमोर भेट करणे थांबवा!”

  16. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  17. मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ? माझे कोण ऐकेल? त्यांचे कान बंद झाले आहेत त्यांना ऐकूच येत नाही. याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते; त्यांना ते सुखद वाटत नाही.

  18. बुद्धिमान लज्जित केले जातील; त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल?

  19. मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी ते परकीय मानले.

  20. “पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.

  21. त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”

  22. “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”

  23. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात.

  24. दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते.

  25. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला, तर माझ्यावरही ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.