मुख्य मजकुरावर जा

Word of God बद्दल बायबलमधील वचने: Conviction of sin from reading

9 वचने · 13 पैलू

Conviction of sin from reading बद्दल वचने

  1. मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिले आहेत.”

  2. मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले.

  3. जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली.

  4. त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  5. “जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”

  6. त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.

  7. त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.

  8. त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.

  9. यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत.