- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
War बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परंतु त्यांच्यात खूप गोंधळ निर्माण करून त्यांचा नाश होईपर्यंत याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हातात देतील.
ते त्यांच्या राजांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांची नावे या पृथ्वीतलावरून पुसून टाकाल. मग कोणीही तुमच्याविरुद्ध उभा राहणार नाही; तुम्ही त्यांचा नाश कराल.
जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूशी युद्ध करण्यास जाल आणि तुमच्यासमोर घोडे व रथ आणि तुमच्या सैन्यापेक्षा फारच मोठे शत्रुसैन्य पाहाल, तेव्हा त्यांना घाबरू नका. कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशातून सुखरुपपणे बाहेर आणले, ते याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर असतील.
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”
जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे.
पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.
तुमच्यापासून दूर असलेल्या व निकटवर्ती नसलेल्या राष्ट्राच्या सर्व शहरांच्याबाबतीत तुम्ही असेच वागावे.
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये.
हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे.
नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.
तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.
तुमची प्रेते पक्ष्यांचे आणि वन्यपशूंचे भक्ष्य होतील आणि त्यांना दूर हाकलून देण्यास तिथे कोणीही नसेल.
याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही.
याहवेह तुम्हाला वेडे व आंधळे करतील आणि तुमची मने गोंधळून जातील.
ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य चाचपडतो तसे, तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात चाचपडाल. जे काही तुम्ही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळणार नाही; तुमच्यावर सतत जुलूम होत राहील आणि तुम्ही सतत लुबाडले जाल, यातून कोणीही तुम्हाला सोडविणारा राहणार नाही.
तुमच्या वाग्दत्त वधूला दुसराच कोणी नेईल व तिचे शीलभंग करेल. तुम्ही घर बांधाल, पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुम्ही द्राक्षमळा लावाल, पण त्या फळांचा उपभोग तुम्ही करू शकणार नाही.
तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही.
तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल.
तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल.
तुमच्यासमोर जे येईल ते पाहून तुम्हाला वेड लागेल.
याहवेह तुमच्या गुडघ्या व पायावर कधीही बरी होणार नाही अशी वेदना देणारी फोडी येऊ देतील, जे अगदी तुमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत भरून जातील.
तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.
याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.
तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.
तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल.