मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 48 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन होईल.

  2. ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील.

  3. त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल: आमच्याकडे एक भक्कम शहर आहे; परमेश्वर त्याचे तारण त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात.

  4. हे पाप तुमच्यासाठी उंच, भेगा पडलेल्या आणि फुगलेल्या भिंतीसारखे, जी अचानक, क्षणार्धात कोसळते अशी होईल.

  5. त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.

  6. यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.

  7. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  8. मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, कास्याच्या तटबंदीची भिंत; ते तुझ्याशी युद्ध करतील परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास मी तुझ्यासोबत आहे,” याहवेह असे म्हणतात.

  9. “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”

  10. तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.

  11. नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.

  12. नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.

  13. मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.

  14. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.

  15. ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ.

  16. “ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात,

  17. म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.

  18. जेव्हा भिंत कोसळेल तेव्हा, “तुम्ही दिलेला चुन्याचा लेप कुठे आहे” असे लोक तुम्हाला विचारणार नाहीत काय?”

  19. “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल.

  20. तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  21. याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले,

  22. जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला.

  23. एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली.

  24. “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन.

  25. “या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.