मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 48 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तकेल: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात.

  2. “फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”

  3. वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.

  4. ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात.

  5. शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!

  6. म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.

  7. जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला आणि त्याला अस्वलाने गाठले, किंवा जसे काय आपल्या घरात येऊन त्याने हात भिंतीला टेकविला आणि त्याला साप चावला.

  8. खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील, आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील.

  9. आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.

  10. परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते.

  11. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसविले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले.

  12. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”

  13. परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो.

  14. कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी.