मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने: Destruction of, a punishment and cause of grief

8 वचने · 48 पैलू

Destruction of, a punishment and cause of grief बद्दल वचने

  1. ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.

  2. त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.”

  3. मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.

  4. आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो.

  5. पुढे आम्ही झर्‍याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.

  6. म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो.

  7. शहरातील अधिकार्‍यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो.

  8. मग मी त्यांना सांगितले, “आपल्या शहराची दुर्दशा तुम्हा सर्वांना माहीतच आहे: यरुशलेम उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याच्या वेशी जळालेल्या आहेत. आपण यरुशलेमच्या तटाची पुनर्बांधणी करू आणि आपल्यावरील हा कलंक धुऊन टाकू.”