मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Church बद्दल बायबलमधील वचने

50 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा.

  2. आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.

  3. तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?

  4. जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.

  5. आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”

  6. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

  7. जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.

  8. आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले.

  9. मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

  10. या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात.

  11. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.

  12. स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे.

  13. आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे.

  14. जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

  15. परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.

  16. आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत,

  17. परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात.

  18. मंडळीतील प्रथम जन्मलेले, ज्यांची नावे स्वर्गात नोंदलेली आहेत त्या मंडळीत तुम्ही आला आहात. सर्वांचा न्याय करणाऱ्या परमेश्वराजवळ, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांच्या आत्म्याजवळ तुम्ही आला आहात.

  19. तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.

  20. तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा;

  21. जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा.

  22. तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”

  23. चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.

  24. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.

  25. मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.”