Titles and Names of the Church बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.
“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.
राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे.
आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका; आपल्या पीडित प्रजेचे जीवन कायमचे विसरू नका.
सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.
याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.
यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान, आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले.
याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.
माझ्या भगिनी, माझ्या वधू तू एका बंद केलेली बाग आहेस; तू एक कुंपणाने घेरलेल्या झर्यासारखी, शिक्कामोर्तब कारंज्याप्रमाणे आहेस.
माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे; सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे. मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे. मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे. मित्र माझ्या मित्रांनो, खा आणि प्या; प्रीतीच्या आनंदाने भरून जा.
मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.”
पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.
अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.
सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!”
मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.
त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.
अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.
मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.
याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”
त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्या शेतकर्यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”
माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.