मुख्य मजकुरावर जा

The Vine बद्दल बायबलमधील वचने

66 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.

  2. इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. त्याने स्वतःसाठी फळे आणली. जसे त्याचे फळ वाढले, तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; जसा त्याचा देश समृद्ध झाला, तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले.

  3. लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.

  4. त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्‍या केल्या आहेत.

  5. द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.

  6. वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका, कारण रानातील कुरणे हिरवीगार होत आहेत. झाडे आपली फळे देत आहेत; अंजिराची झाडे आणि द्राक्षवेली पुन्हा आपले सत्व देत आहेत.

  7. प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही, कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे.

  8. धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”

  9. “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्‍यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”

  10. “ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन.

  11. कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  12. मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”

  13. “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.

  14. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  15. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.

  16. जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात.