The Vine बद्दल बायबलमधील वचने: Sibmah
Sibmah बद्दल वचने
हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.
म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.