Skip to content

The Vine बद्दल बायबलमधील वचने

66 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला.

  2. तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.

  3. तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.

  4. सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.

  5. तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  6. जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये.

  7. तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)

  8. ते जेव्हा अष्कोल खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली.

  9. त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता.

  10. तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल,

  11. गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे;

  12. तुम्ही तुमच्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलात, तर हवी तितकी द्राक्षे तुम्ही खावी, परंतु टोपलीत घालून तुम्ही काहीही नेऊ नये.

  13. त्यांनी त्याला कळपातील गाईंचे दही-दूध, पुष्ट शेळ्या आणि मेंढरे, आणि बाशानाचे अस्सल मेंढे, आणि सर्वोत्तम गहू पुरविला, तुम्ही गडद लाल फेसाळणारा द्राक्षारसही प्यालात.

  14. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.

  15. तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.

  16. त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते.

  17. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.

  18. त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती.

  19. त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.

  20. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  21. न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.

  22. त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला.

  23. तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.

  24. रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.

  25. पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले, आणि विजेच्या अग्निलोळांनी त्या राष्ट्रावर वर्षाव केला.