मुख्य मजकुरावर जा

The High Priest बद्दल बायबलमधील वचने

142 वचने · 65 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.

  2. तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये

  3. कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.

  4. तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.

  5. अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत

  6. त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.

  7. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

  8. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  9. आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ

  10. किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.

  11. याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.

  12. “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.

  13. त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.

  14. “ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत.

  15. त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.

  16. “ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे.

  17. “ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये.

  18. ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये.

  19. त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे.

  20. परंतु त्यांनी तो दुसर्‍या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.

  21. त्यांनी दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत.

  22. पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल.

  23. “ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्‍या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”

  24. ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले.

  25. आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.