The High Priest बद्दल बायबलमधील वचने: Plate or crown of gold, &c
Plate or crown of gold, &c बद्दल वचने
“शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: याहवेहसाठी पवित्र.
आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध.
ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”