मुख्य मजकुरावर जा

The High Priest बद्दल बायबलमधील वचने: Presiding in the superior court

19 वचने · 65 पैलू

Presiding in the superior court बद्दल वचने

  1. येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते.

  2. परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्‍यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.

  3. मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

  4. परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली,

  5. “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”

  6. हे ऐकून महायाजक उभा राहिला आणि त्याने येशूंना म्हटले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?”

  7. ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली.

  8. तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्‍यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की,

  9. “तुरुंगाचे दरवाजे व्यवस्थित बंद केलेले होते आणि पहारेकरी दाराबाहेर उभे होते. परंतु आम्ही दरवाजे उघडले, तेव्हा आम्हाला कोणीही आढळले नाही.”

  10. मंदिराच्या सुरक्षा अधिकार्‍याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.

  11. इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.”

  12. तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती.

  13. प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले.

  14. ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”

  15. मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.”

  16. यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला.

  17. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”

  18. पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  19. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”