मुख्य मजकुरावर जा

The Armies of Israel बद्दल बायबलमधील वचने

137 वचने · 50 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला,

  2. आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.

  3. पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”

  4. तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि अराम्यांचा सामना करीत राजा रथातच राहिला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत रथाच्या तळाशी साचले आणि त्या संध्याकाळी तो मरण पावला.

  5. सूर्य मावळत असताना, सैन्यात एकच घोषणा झाली: “प्रत्येकाने आपआपल्या नगरात जावे, प्रत्येकाने आपआपल्या देशात जावे!”

  6. राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले.

  7. शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.

  8. अहाबाच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, हस्तिदंताने मढविलेला जो राजवाडा त्याने बांधला, व ज्या शहरांचे तट त्याने बांधले ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेले नाही काय?

  9. अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  10. इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला.

  11. यहोशाफाट राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती.

  12. त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  13. यहोशाफाट व इस्राएलचा राजा यांच्यात शांती होती.

  14. यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय?

  15. त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले.

  16. त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.

  17. ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत.

  18. तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला.

  19. त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  20. यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.

  21. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले.

  22. त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.

  23. इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत.

  24. पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.

  25. तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.