मुख्य मजकुरावर जा

Strangers in Israel बद्दल बायबलमधील वचने

65 वचने · 33 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “असा कोणी परदेशी जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही परंतु आपल्या नावास्तव लांबच्या देशातून आला;

  2. कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,

  3. तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान तिथून आपण त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही आपल्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी आपले नाव ओळखावे व आपल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपले भय धरावे व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर आपले नाव आहे.

  4. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).

  5. आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले.

  6. दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्‍या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली.

  7. शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले.

  8. त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.

  9. हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते.

  10. ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात;

  11. याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.

  12. तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली.

  13. या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात.

  14. कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी.

  15. पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील.